TOD Marathi

IIT च्या संशोधकांनी बनवले ‘ब्लॅक फंगस’वर प्रतिबंधक औषध!; 200 रुपयांत उपलब्ध होणार Tablet

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. 31 मे 2021 – कोरोना काळात म्युकरमायकोसिस म्हणजेच ‘ब्लॅक फंगस’ने मनुष्यावर हल्ला केलाय. हा आजार कोरोना झालेल्या रुग्णांना होत आहे. यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. हैदराबाद इथल्या आयआयटीच्या संशोधकांनी ब्लॅक फंगस प्रतिबंधक औषध बनवले आहे. या प्रतिबंधक औषधाची 60 ग्रॅमची गोळी 200 रुपयांना उपलब्ध होणार आहे.

आयआयटी हैदराबादमधील केमिकल इंजिनीयरिंग विभागातील प्रा. सप्तर्षी मुझुमदार, डॉ. चंद्रशेखर शर्मा तसेच तेथील पीएचडी स्कॉलर मृणालिनी गायधनी व अनिंदिता लाहा यांची टीम हे संशोधन करत आहे.

‘काळा आजार’ या रोगावर वापरण्यात येणारी औषधे सध्या ब्लॅक फंगस तसेच अन्य बुरशीजन्य आजारांसाठी वापरली जातात. काळा आजारावर ‘ॲम्पह्टेरीसिन बी’ हे औषध प्रभावी आहे, असा शोध प्रा. मुझुमदार आणि शर्मा यांनी 2019 मध्येच लावला होता. तेव्हा ते इंजेक्शन स्वरूपात उपलब्ध होते.