मुंबई: एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच, त्यांच्या पहिल्या विवाहाचा निकाहनामाही ट्विटरद्वारे जारी केला आहे. अशातच याप्रकरणी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना या ड्रग्ज प्रकरणाशी माझा, माझ्या जातीचा, धर्माचा, नावाचा काय संबंध हे मला नवाब मलिक यांनी सांगावं, असा प्रश्न त्यांनी विचारलाय. सर्विस बुकवर माझ्या नावाची ज्ञानदेव वानखेडे अशीच नोंद आहे. माझ्या सर्व शासकीय कागदपत्रांमध्येही नावाची नोंद ज्ञानदेव वानखेडे अशीच आहे, अशी माहिती समीर वानखेडेंच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला सध्या वेगळं वळण मिळालं आहे. या प्रकरणी सध्या आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. तसेच, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. मात्र प्रकरण ड्रग्सचं होतं पण याला आता वेगळेच वळण मिळत आहे. नेमका काय निकाल लागतो याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.