मुंबई : राज्यात विधान परिषदेच्या ( Vidhan Parishad) निवडणुकीत जास्त उमेदवार देऊन भाजपला (BJP ) पैशांचं राजकारण करायचं आहे, तसेच राज्यात गोंधळी निर्माण करायचा आहे, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत ( Shivsena Leader Sanjay Raut ) यांनी केला आहे. भाजपकडून पाचव्या आणि सहाव्या जागेसाठी उमेदवार जाहीर करण्यात आल्यानंतर राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Candidate for Vidhan Parishad )
वार्ताहरांशी बोलताना राऊत म्हणाले (Sanjay raut) की, राज्याच्या राजकारणातून मुंडे-महाजन (Munde Mahajan) यांचं नाव मिटवण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू आहेत का? राज्यातील राजकारणात गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा आजही प्रभाव आहे. (Gopinath Munde )
तसेच औरंगाबाद (Aurangabad) येथे बुधवारी झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thakrey) यांच्या सभेवर टीका करणाऱ्या विरोधकांचा राऊत यांनी चांगलाच खरपूस शब्दांत समाचार घेतला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सर्व मुद्यांवर भाष्य केलं असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान येत्या 20 जून रोजी राज्याचे विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता राज्यसभेच्या ( Rajyasabha Election) निवडणुकीप्रमाणे आता राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीही मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.