TOD Marathi

गांधीनगर : गुजरातमधील ( Gujrat) २४ वर्षीय क्षमा बिंदूनं (kshama bindu) अखेर स्वतःशीच लग्नगाठ बांधली आहे. ११ जूनला क्षमाचा विवाह ठरला होता. मात्र, राजकीय आणि सामाजिक विरोध पाहता तीन दिवस आधीच विवाह उरकून घेत (kshama bindu sologamy)

क्षमाने अखेर स्वतःशीच लग्न केलं आहे. (Kshma Bindu Marriage )   या अनोख्या लग्नाची चर्चा देशभरात होत होती. काही जणांनी क्षमाच्या या संकल्पनेला विरोध केला होता. तर, काहींनी तिला पाठिंबादेखील दिला होता. अखेर या विरोधाला न जुमानता क्षमाने बुधवारी लग्न केलं आहे. सर्व रिती- रिवाजानुसार क्षमाने घरीच लग्न केलं आहे.

लग्नाच्यादरम्यान हळद, मेहंदी व सात फेरे हे सगळे रिती-रिवाज तिने मोठ्या आनंदाने केले आहेत. वडोदरातील गोत्री येथील आपल्या राहत्या घरीच तिने रिती- रिवाजांसोबत लग्न केलं आहे. आश्चर्य म्हणजे, या लग्नात नवरदेव तर नव्हताच पण पंडितही नव्हते. फक्त मोजक्याच मित्र- मैत्रिण आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत तिने लग्न केलं आहे.

दरम्यान  क्षमाने यापूर्वी मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भाजप नेत्यांनी या लग्नाला कडाडून विरोध केला होता. त्यानंतर भटजींनीही लग्न लावायला नकार दिला. त्यानंतर घरीच लग्न करण्याचा निर्णय घेत क्षमाने टेपरेकॉर्डरवर (Teprecorder ) मंत्र लावून लग्न केले. क्षमाच्या या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे.