बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचं काही दिवसांपूर्वीच लग्न पार पडलं. ही जोडी सध्या एकमेकांसोबत लाइफ एन्जॉय करत आहेत. कतरिना नेहमीच सोशल मीडियावर पती विक्की कौशलसोबतचे रोमॅंटिक फोटो शेअर करत असते. आता अलीकडे तिने पुन्हा दोघांचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सोशल मीडियावर शेअऱ केलेल्या या फोटोंमध्ये विक्की कौशल आणि कतरिनामधील जबरदस्त केमिस्ट्री बघायला मिळत आहे. कतरिनाने फोटो पोस्ट करतानाच हे फोटो व्हायरल झालेत आणि चर्चेचा विषय ठरत आहेत.
या फोटोंमध्ये कतरिना आणि विकी हे दोघेही रोमॅंटिक मूडमध्ये दिसत आहेत. कतरिनाने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना कॅप्शनही भारी लिहिलं आहे. तिने लिहिलं की, ‘मी आणि माझा’.
कतरिना आणि विकीच्या या फोटोंना त्यांचे चाहते आणि नेटकरी भरभरून प्रेम देत आहेत, कमेंट्स करत आहेत. शूटिंगमध्ये व्यस्त असताना वेळ मिळाला की हे कपल एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात.