TOD Marathi

ठाणे: ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर शिवसेना व युवासेनेच्या वतीने वेदांता प्रकल्प (Vedanta Foxconn Project to start in Maharashtra, Shivsena Thane writes a letter to PM) महाराष्ट्रात सुरू करावा असे नागरिकांच्या स्वाक्षरीचे पत्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे. यासाठी स्वाक्षरी मोहिम राबिवण्यात आली. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या स्वाक्षरी मोहिमेत शिवसेनेचे खासदार राजन विचारे (MP Rajan Vichare), महिला आघाडी अनिता बिर्जे, जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

या पत्रामध्ये दि. ३० मे २०१९ च्या दिवसाची आठवण करून दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेताना आम्हा देशवासीयांना ग्वाही दिली होती की देशाच्या संविधानाचा आदर करून कोणताही पक्षपातीपणा न करता देशातील सर्व जनतेच्या विकासासाठी कार्य करीन परंतु आज आमच्या महाराष्ट्राच्या वाट्याला एक लाख रोजगार निर्मिती होणारा वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प अचानक गुजरातला नेल्याने महाराष्ट्रावर एक प्रकारचे अन्याय केल्याचे दिसून आले आहे. आपण पंतप्रधान आहात. सगळ्या देशाचे पालक आहात. तेव्हा एका मुलाला न्याय देताना दुसऱ्या मुलावर अन्याय आपण कसा करू शकता असे पत्रात म्हटले आहे. (Shivsena Thane writes a letter to PM Narendra Modi)

गुजरात ढोलेरा येथे मोठी औद्योगिक वसाहत गुजरात सरकार उभारत आहे. तेथे इतरही प्रकल्प आणता येतील पण महाराष्ट्रात यापूर्वीचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (Former CM Aditya Thackeray, DCM former Ajit Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मेहनत करून महाराष्ट्रासाठी मंजूर झालेला हा प्रकल्प गुजरातला पळवल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकल्प राज्यात तळेगाव, पुणे येथे सुरू करण्याचा निर्णय झाला होता. महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पासाठी ३९ हजार कोटी सवलत दिली होती. २० वर्षासाठी प्रतिदिन ८० दशलक्ष लिटर पाणी, स्टॅम्प ड्युटीत पाच टक्के सवलत, वीज दरात दहा वर्षासाठी ७.५ टक्के सवलत, तळेगावला ४०० एकर जागा मोफत आणि ७०० एकर जागा ७५ टक्के सवलतीच्या दराने २० वर्षासाठी या कंपनीला १२०० मेगावॅट वीज पुरवठा ३ रुपये युनिट दराने, पाणीपट्टीत ३३७ कोटी व घनकचरात ८१२ कोटीची सवलत जाहीर केली होती. त्यामुळे या कंपनीने महाराष्ट्रात १.५३ लाख कोटीची गुंतवणुकीची तयारी दर्शवली होती. त्यातून राज्यातील किमान एक लाख रोजगार निर्मिती होणार होती. दि. २६ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री कार्यालयाकडून देखील हा प्रकल्प महाराष्ट्रातच सुरू होत असल्याचे जाहीर देखील केले होते. राज्याच्या जी डी पी मध्ये देखील या प्रकल्पाने वाढ झाली असती परंतु ते सगळे केलेली मेहनत व प्रयत्न संपविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र पहिल्यापासून औद्योगिक (Industries in Maharashtra) दृष्ट्या अग्रेसर राहिलेल्या आहे वेदांत फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरात सरकारने पळविल्यामुळे महाराष्ट्राच्या तोंडाशी आलेला घास हिरकवून घेतल्याने हजारो तरुण तरुणींचा रोजगार हिरावून घेतल्यामुळे त्यांचे भवितव्य धोक्यात आलेले आहे. यासाठी सदर प्रकल्प महाराष्ट्रातच सुरू करावा अशी मागणी ठाणे शिवसेनेच्या वतीने पत्राद्वारे करण्यात आली आहे.