टिओडी मराठी, दि. 22 मे 2021 – कोरोना काळात केंद्र सरकार अडचणीत आहे, असं म्हणत भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेले 99 हजार कोटी रुपये हि अतिरिक्त रक्कम केंद्राला दिली आहे. यावरून हे पैसे लसीकरणासाठी वापरावेत, असा सल्ला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला दिला आहे.त्यांनी याबाबतचे ट्विट केलं आहे.
रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलंय कि, देशाला आज लसीकरणाची सर्वाधिक गरज असून केंद्राने व्यापक लस निर्मिती आणि वितरण कार्यक्रम हाती घेऊन देशाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढावे. त्यासाठी बजेटमध्ये केलेली ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद आणि रिझर्व बँकेकडून मिळालेले अतिरिक्त ९९ हजार कोटी रुपये या लसीकरण कार्यक्रमासाठी वापरता येतील.
राज्ये स्वतःच्या पायावर उभी राहिली तर देश उभा राहील. त्यासाठी राज्याची लोकसंख्या, तिथं कोरोनाचा झालेला प्रादुर्भाव आणि GST मध्ये संबंधित राज्याचा वाटा यानुसार राज्यांना देण्यात येणाऱ्या निधीचे प्रमाण ठरवावं, असं केलं तर कोरोनावर आपण लवकर नियंत्रण मिळवू शकू, असेही त्यांनी म्हटलंय.