मनसेचे वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी

पुणे :
मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (MNS Leader Vasant More) यांच्या मुलाला धमकी दिल्याची घटना घडली आहे. त्यानंतर वसंत मोरे यांनी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

 

अज्ञात इसमाने रुपेश मोरे याच्या गाडीवर एक चिठ्ठी ठेवली होती. या चिठ्ठीमध्ये रूपेशला धमकी देण्यात आली आहे. “सावध राहा रुपेश” असा उल्लेख या चिठ्ठीत आहे. या घटनेनंतर वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.

वसंत मोरे हे पुण्यातील प्रसिद्ध नेते आहेत, विविध सामाजिक कामं आणि गरजूंना मदत करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. सोशल मीडियावर त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. अनेक गोष्टी ते सोशल मीडियावरुन शेअर करत असतात.

Please follow and like us: