TOD Marathi

ड्रग्ज प्रकरणी Underworld don Dawood चा भाऊ इक्‍बाल कासकरला अटक; Mumbai पोलिसांची धडाकेबाज कारवाई

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, मुंबई, दि. 23 जून 2021 – नारकोटिक्‍स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने धडाकेबाज कारवाई करत ड्रग्ज प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्‍बाल कासकर याला अटक केली आहे. जप्त केलेल्या या ड्रग्जची किंमत कोटीत आहे.

मुंबईमधील ड्रग्ज प्रकरणात इक्‍बाल कासकर याचा हात असल्याचे धागेदोरे एनसीबीच्या हाती लागले होते. त्यानंतर एनसीबीने इक्‍बाल कासकरला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर इक्‍बालला एनसीबीने अटक केली. लवकर त्याला न्यायालयात हजर केले जाणार असून चौकशीसाठी कोठडीची मागणी केली जाणार आहे.

मागील वर्षभरापासून एनसीबीचे अधिकारी मुंबईत कारवाई करून ड्रग्ज प्रकरणाची सखोल चौकशी करताहेत. याच कारवाईदरम्यान वेगवेगळे पुरावे व धागेदोरे एनसीबी अधिकाऱ्यांच्या हाती लागले आणि आता ड्रग्ज प्रकरणाचा संबंध थेट अंडरवर्ल्ड सोबत असल्याचे एनसीबीच्या निदर्शनास आले. त्यानंतर एनसीबीने ही कारवाई केलीय.

मुंबईत मागील दोन दिवसांत एनसीबी अधिकाऱ्यांनी मुंबईत धडाकेबाज करावाई केल्यात. या कारवाईत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अधिक प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केलाय. जप्त करण्यात आलेल्या या ड्रग्जची किंमत कोट्यवधी रुपयांत आहे, अशी माहिती समोर आली होती.

इक्‍बाल कासकर अगोदरपासून ठाण्याच्या कारागृहात आहे. या प्रकरणाची चौकशी करताना एनसीबीला टेरर फंडिंग आणि ड्रग्ज सप्लायसाठी अंडरवर्ल्ड कनेक्‍शनबाबत महत्त्वाचे धागेदोरे हाती लागलेत.