TOD Marathi

UGC Guidelines : 30 September पूर्वीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा, अन 1 October पासून नवे सत्र सुरु करा – UGC चे महाविद्यालयांना निर्देश

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 17 जुलै 2021 – विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालये आणि विद्यापीठांसाठी शैक्षणिक वेळापत्रक जारी केलंय. त्यात महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया ही 30 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करावी. म्हणजे 1 ऑक्टोबरपासून नियमित सत्र सुरु केले जाईल, अशा प्रकारचे निर्देश दिलेत.

शेवटच्या वर्षाच्या परीक्षा या 31 ऑगस्टपूर्वी घेणं गरजेचं आहे. त्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने घ्याव्यात, असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांना दिलेत.

इंटरमिडिएट विद्यार्थ्यांचे मूल्यांकन हे अगोदरच्या सेमिस्टरच्या आधारे करावं, त्यासंबंधी 2020 साली दिलेल्या गाईडलाईन्सचे पालन करावे, असंही विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केलंय.

बारावीचा निकाल 31 जुलै रोजी लागणार असून या निकालानंतर महाविद्यालये आपली प्रवेश प्रक्रिया सुरु करु शकतील. जर काही कारणामुळे बोर्ड परीक्षेचा निकाल लांबला तर महाविद्यालये 18 ऑक्टोबर 2021 पर्यंत आपले शैक्षणिक सत्राला सुरुवात करण्याचे नियोजन करु शकतात, असे ही विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केलंय.

देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम शाळा आणि महाविद्यालयांच्या परीक्षांवर झाला आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द केल्यामुळे महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया कशा पार घ्यायच्या ? यावर खलबतं झाली आहेत.

अखेर त्या-त्या राज्यांतील सरकारांनी यावर तोडगा काढला आहे. महाराष्ट्रामध्ये पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. आजवरच्या सेमिस्टरच्या मूल्यांकनावरुन पदवीचा निकाल लावणार आहे, असे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलंय.