TOD Marathi

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना रविवारी रात्री उशिरा ईडीने अटक केल्यानंतर सकाळी उद्धव ठाकरे यांनी राऊत कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. (Uddhav Thackeray Press Conference) यावेळी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (BJP President J P Nadda) यांच्या वक्तव्याच्या समाचार घेतला.

नड्डा यांनी देशातील घराणेशाही प्रादेशिक पक्ष संपवणार असल्याचे वक्तव्य केले. हे वक्तव्य म्हणजे देशाला एकछत्री कारभाराकडे, हुकूमशाहीकडे नेणारे असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. राजकारण हे बुद्धिबळासारखे असल्याचे म्हटले जाते मात्र सध्याच्या राजकारणात बुद्धीच्या नव्हे तर बळाचा वापर सुरू आहे. बळाचा वापर करणाऱ्यांनो लक्षात ठेवा की दिवस फिरतात. जोपर्यंत सत्तेचा फेस त्यांच्याभोवती आहे, तोपर्यंत आनंद घेत आहेत असं म्हणत त्यांनी भाजपसह शिंदे गटावर टीका केली. (Uddhav Thackeray criticized Shinde group and BJP)

आता सुरू असलेलं राजकारण हे घृणास्पद असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. देशातील राजकारण आता ज्या पद्धतीने सुरू आहे त्यावर आता लोकांनी आपल्या देशातील भविष्य कसं असावं, त्याला मदत करायची का? हे ठरवण्याची वेळ आली आहे. यासोबतच संजय राऊत यांचा मला अभिमान आहे. (Sanjay Raut ED Inquiry) संजय राऊत जसं म्हणाले की मरेन पण शरण जाणार नाही. त्याप्रमाणे कुठल्याही परिस्थितीत ते कुणाला शरण गेले नाहीत असेही उद्धव ठाकरे म्हणाले.