TOD Marathi

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टाने 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. (Sanjay Raut ED inquiry) त्यामुळे आता 4 ऑगस्टपर्यंत संजय राऊत यांना ईडीच्या कोठडीत राहावं लागणार आहे. रविवारी दिवसभर चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा संजय राऊत यांना अटक केली होती.

संजय राऊत यांना अटक केल्यानंतर आज त्यांची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली, त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी काही वेळापूर्वी संजय राऊत यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला होता. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्या बद्दल मला अभिमान आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते.

संजय राऊत यांना ईडी कोठडी सुनावल्यानंतर संजय राऊतांना घेऊन ईडी अधिकारी आता कोर्टातून रवाना झाले आहेत.