उद्धव ठाकरेंची मशाल काँग्रेसच्या हातात आहे, उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह मिळू द्या किंवा आणखी कुठलेही चिन्ह मिळू द्या. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसत आपल्या पक्षाचा मूळ विचार सोडलेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची ‘बाळासाहेबांची शिवसेना’ ही महत्त्वाची आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं. संघटनात्मक दौऱ्यानिमित्त ते भंडारा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. (BJP Maharashtra President Chandrashekhar Bawankule criticizes Uddhav Thackeray on new party sumbol) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लंपी आजार झाला आहे. याचा पुनरुच्चार देखील त्यांनी यावेळी केला.
कायम मोदींवर टीका करण्यापेक्षा आपण आपल्या जिल्ह्यासाठी काय केलं? याचा विचार केला पाहिजे. एक तरी मोठा काम सांगावं जे तुम्ही तुमच्या जिल्ह्यासाठी केलं असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (What Nana Patole has done for his district, asks Chandrashekar Bawankule) यांच्यावर देखील जोरदार टीकास्त्र सोडलं. अडीच वर्षांच्या सरकारमध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी एकही मोठी गोष्ट न करता केवळ मोदींवर टीका करून धन्यता मानण्यात काहीही अर्थ नाही.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधी (Bharat Jodo Yatra by Congress) महाराष्ट्रातून केवळ तीन-चार लोकसभा मतदारसंघातून प्रवास करणार आहेत. केरळ सारख्या राज्यात 20 दिवस आणि महाराष्ट्रात 14 दिवस..? त्यातही काही मोजके मतदारसंघ. याचा अर्थ महाराष्ट्र आपल्याला स्वीकारणार नाही, याची माहिती राहुल गांधींना आहे आणि म्हणूनच ते मोजक्या ठिकाणाहून जात आहेत. असं म्हणत काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर देखील त्यांनी टीका केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांनी आपण काय आहोत, आपली पातळी काय आहे, हे देखील तपासलं पाहिजे, असं म्हणत त्यांच्यावर टीका करणाऱ्यांवर देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार हल्ला चढवला.