मुंबई :
‘माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), त्यांच्या पत्नी रश्मी आणि चिरंजीव आदित्य व तेजस यांनी मोठ्या प्रमाणात बेहिशेबी संपत्ती जमवली असून त्याबाबत सीबीआय व सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) तपास करण्याचा आदेश द्यावा’, अशा विनंतीच्या फौजदारी जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात येत्या ८ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.
दादरमधील गौरी भिडे व त्यांचे वडील अभय भिडे यांनी ही याचिका केली आहे. यापूर्वी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता (Chief Justice Dipankar Datta) यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने तांत्रिक कारणामुळे सुनावणीस नकार दिला होता आणि हा विषय अन्य योग्य खंडपीठासमोर सुनावणीस ठेवण्याचे निर्देश रजिस्ट्रीला दिले होते. त्या अनुषंगाने आता न्या. धीरज ठाकूर व न्या. वाल्मिकी मेनेझेस यांच्या खंडपीठासमोर या प्रश्नी सुनावणी होणार असल्याचे निश्चित झाले आहे.