TOD Marathi

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे(Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडी(Vanchit Bahujan Aghadi) यांच्या युतीच्या बातम्या आल्या. ही बातमी येत नाही तोच आणखीन एका नव्या युतीची बातमी आली. एकनाथ शिंदेंच्या(Eknath Shinde) नेतृत्वात असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे( Jogendra Kawade) यांनी युतीवर सूचक भाष्य केलं आहे. जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टीची (Peoples Republican Party)यापूर्वी काँग्रेससोबत युती केली मात्र त्यांनी दगाबाजी केली. अन्य कुठल्या पक्षाने सन्मानजनक जागा वाटपाचा प्रस्ताव ठेवल्यास सोबत जाणार असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास त्यांच्यासोबतही जाण्याचा विचार करता येईल असंही जोगेंद्र कवाडे म्हणाले.

खरंतर राजकारणात काहीही होऊ शकतं असं म्हणतात. कधीकाळी काँग्रेस सोबत युतीत असलेले जोगेंद्र कवाडे यांनी हा विचार व्यक्त करणे यामुळे अनेक गोष्टींना जागा निर्माण होते. असं असलं तरी राज्यात येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुंबई, पुणे नागपूरसह विविध महानगरपालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणूक आहेत. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना हे दोन्ही पक्ष अर्थातच निवडणुका लढवतील आणि एकमेकांसमोर आव्हानही उभं करतील. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांना किती नंबर्स मिळतात हे या दोन्ही पक्षांसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे.

आतापर्यंत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप(Bharatiya Janata Party) युतीच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते येणाऱ्या सर्व निवडणुका युतीमध्ये लढवणार आहेत मात्र बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला जर आणखी मजबूत होऊन उभं राहायचं असेल तर त्यासाठी काही मार्ग नक्कीच शोधावे लागतील त्यामुळे जोगेंद्र कवाडे यांनी म्हटलं तसं बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत ते आले तर फायदा दोघांनाही होऊ शकतो. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार असलं तरी येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून अनेक गोष्टी सिद्ध कराव्या लागणार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे जोगेंद्र कवाडे यांच्या या भूमिकेचा काय आणि कसा विचार करतात हे बघावं लागणार आहे.