टिओडी मराठी, दि. 17 जुलै 2021 – अवघ्या आठ महिन्यांपूर्वी लाँच केलेले ‘फ्लिट्स’ हे फीचर बंद करणार आहे, अशी घोषणा ट्विटरने केली आहे. हे फीचर इन्स्टाग्राम स्टोरीपासून प्रभावित होत होते. फ्लिट्स 3 ऑगस्टपासून बंद केले जाणार आहे. त्याऐवजी कंपनी दुसरे फीचर आणणार असून फ्लिट्सकडून अपेक्षा होत्या. मात्र, आता निरोप घेण्याचा वेळ अली आहे, असे ट्विटरने म्हटले आहे.
फ्लिट्सवरून लोक चर्चा करतील, असे वाटले होते. मात्र, जे युजर्स अधिक ट्विट्स करत होते, तेच याचा वापर करत आहेत. अनेक युजर्सला फ्लिट्समध्ये रस नाही. युजर्सची अपेक्षेप्रमाणे संख्या ही वाढत नव्हती, असे स्पष्टीकरण ट्विटरने दिलं आहे.
फ्लिट्समध्ये युजर्स अधिक करून फोटो, व्हिडिओ शेअर करायचे जे 24 तासांनंतर आपोआप रिमूव्ह केले जायचे. सध्या नव्या फीचरवर काम सुरूय. त्यात फूल स्क्रीन पॅमेरा, टेक्स्ट फॉर्मेटिंग ऑप्शन व जीआयएफ स्टिकर्स असणार आहे.
तसेच टाइमलाईन स्क्रीनचा महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे त्यावर काही नवे फीचर्स ही मिळतील, अशी माहितीही ट्विटरने दिलीय.