पुणे: पुण्यात गेले काही दिवस पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर मुठा नदीवर (Mutha Nadi) असलेला भिडे पुल (Bhide Bridge) पाण्याखाली गेला होता, आणि त्यानंतर तिथली वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र शनिवारी पोलिसांनी बॅरिकेट्स काढल्यानंतर तिथे एकच गर्दी झाल्याचे पहायला मिळाले. इतकचं नव्हे तर संध्याकाळी पुलावरुन ट्रॅफिक जॅम असून सुद्धा लोकं फुटपाथवरून गाडी घेऊन जात होते.
मागील २ दिवस तिथे पोलिसांनी बॅरिकेट्स लावून सुद्धा सामान्य जनता ते बॅरिकेट्स बाजूला करून आपला रस्ता शोधत होते. त्यावर पोलिस लोकांना माघारी फिरा असं देखील सांगत होते, मात्र शनिवारी संध्याकाळच्या सुमारास तिथे एकूणच गर्दी पाहायला मिळाली. चारचाकी वाहनांना त्या पुलावर परवानगी नसतांनाही तिथून वाहनं जात होती, काही दुचाकीस्वार फुटपाथवरून पण जातांना पहायला मिळाले. (Lot of crowd found on Bhide bridge)
नदीचा प्रवाह अजूनपण कमी झालेला नसून तो प्रवाह कायम आहे, परंतु जे दृश्य भिडे पुलावरती पहायला मिळाली ती अगदीचं थरारक होती.