TOD Marathi

मुंबई : एकनाथ शिंदे गटाविरोधात रस्त्यावर उतरणारे शिवसेनेचे पहिले खासदार संजय मंडलिकदेखील एकनाथ शिंदे गटाच्या मार्गावर असल्याच्या चर्चांना चांगलच उधाण आलं आहे. खासदार संजय मंडलिक हे कोल्हापूरचे खासदार आहेत. संजय मंडलिक ( Kolhapur Shivsena MP Sanjay Mandlik ) यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला जातोय. या मेळाव्यात कार्यकर्ते शिंदे गटात जाण्याचा आग्रह धरू शकतात. याच आग्रहाचे कारण देत आपण शिंदे गटात जात असल्याची घोषणा ते करणार असल्याची शक्यता आता वर्तविली जात आहे. खासदार धैर्यशील मानेदेखील ( Kolhapur MP Dhairyshil Mane ) शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणार असल्याचं आता खासगीत बोललं जातंय.

विशेष म्हणजे खासदार मंडलिक यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेतून गेले ते बेन्टेक्स होतं, आता राहिलेले अस्सल सोनंच, असं वक्तव्य त्यांनी केल्यानं ते शिवसेनेशी अर्थात उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहणार का?, असा सवाल आता सर्वसामान्यांकडून विचारला जातो आहे. जवळपास तीन वर्षांपूर्वी संजय मंडलिक यांनी कोल्हापूरमधून लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे दोन खासदार आहेत. या दोन्ही खासदारांनी पक्ष सोडणार नसल्याचे म्हटले होते. खासदार संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज दुपारी कागल तालुक्यातील हमीदवाडा येथे आयोजित करण्यात आला आहे.

दरम्यान कोल्हापूरमधून राजेंद्र पाटील, (Rajendra Patil )आमदार प्रकाश आबिटकर (MLA Prakash Abitakar ) आणि शिवसेनेचे नेते नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर मंडलिक आणि माने या दोन्ही खासदारांनी उद्धव ठाकरे यांना साथ देणार असल्याचे स्पष्ट केले होते.