TOD Marathi

Tokyo Olympics 2020 : अभिनंदन ; वेटलिफ्टिंगमध्ये स्पर्धेत Mirabai Chanu ने मिळवलं Silver Medal, भारताने पदकांचं खातं उघडलं

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, टोकियो, दि. 24 जुलै 2021 – जपान देशाच्या टोकियो येथे सुरु असलेल्‍या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला पहिलं पदक मिळालं आहे. वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजन गटात मीराबाई चानूने रौप्यपदक मिळवलंय. मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये भारताला ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासामध्ये दुसरं पदक मिळवून दिलंय. भारताकडून वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी मीराबाई पहिली महिला खेळाडू आहे. याबाबत मीराबाई चानूचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तसेच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज नेत्यांनी तिचे अभिनंदन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाईसोबतचा एक फोटो ट्वीट केलाय.

या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये यापेक्षा चांगली सुरुवात असू शकत नाही. अवघा भारत मीराबाईच्या कामगिरीने आनंदी आहे. वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल तिचं अभिनंदन. तिचं यश प्रत्येक भारतीयांना प्रेरीत करेल.

या स्पर्धेत मीराबाई चानूने शानदार प्रदर्शन करत वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच प्रकारामध्ये सुमारे 87 किलो वजन उचललं तर क्लीन अँड जर्कमध्ये मीराबाई चानूने 115 किलो वजन उचलून हे पदक पटकाविले. तर, वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजन गटात सुवर्णपदक चीनच्या जजिहूला मिळालंय.