TOKYO 2020 : Mirabai Chanu यांनी मिळवलेलं यश अन्य खेळाडूंना प्रेरणादायी ठरेल – Deputy CM अजित पवार

टिओडी मराठी, मुंबई, दि. 24 जुलै 2021 – जपान येथे सुरु असलेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत महिलांच्या 49 किलो वजनी गटात मीराबाई चानू यांनी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मिळवलेलं यश भारतीय संघातील अन्य खेळाडूंना उत्तम कामगिरी केली आहे. यामुळे अन्य खेळाडूंना प्रेरणा मिळेल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीराबाई चानू यांचं कौतुक केलं.

भारताला वेटलिफ्टिंगचं रौप्यपदक आणि पहिलं ऑलिंपिक पदक जिंकून देणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केलंय.

2016 च्या रिओ ऑलिंपिकमधल्या अपघाती अपयशावर मात करुन मीराबाई चानू यांनी यंदाच्या टोकियोत जिंकलेलं पदक हे अपयशानं खचून न जाता नव्या ऊर्जेने जीवनात कसं यशस्वी व्हावं?, याचं आदर्श उदाहरण आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Please follow and like us: