टिओडी मराठी, टोकियो, दि. 24 जुलै 2021 – टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील १० मीटर एअर पिस्तूल शूटिंग स्पर्धेमध्ये भारताला पदक मिळविता आलं आंही. १० मीटर एअर स्पर्धेमध्ये भारताच्या सौरव चौधरीला सातव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. या स्पर्धेत सौरभ सातव्या स्थानावर राहिला आहे. मात्र, दि. २७ जुलै रोजी शूटिंग स्पर्धा सुरू होणार आहे. त्यामुळे तो पदक घेऊन येईल, असा विश्वास त्याच्या घरच्यांनी दाखविला आहे.
याअगोदर त्याने पात्रतेमध्ये उत्तम कामगिरी करून अंतिम सामन्यात स्थान पटकाविले होते. या स्पर्धेमध्ये सौरभने ९८.६ गुण मिळवले आणि तो सातव्या क्रमांकावर गेलाय. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये प्रथमच सर्वात कमी वयाचा स्पर्धकाने सातवा क्रमांक मिळविला आहे.
सौरभने पात्रता फेरीमध्ये उत्तम कामगिरी करत प्रथम स्थान पटकावत अंतिम फेरीत स्थान मिळविले होते. या दरम्यान त्याने एकूण ५८६ गुण मिळवले. तर भारताचा अभिषेक वर्मा ५७५ गुणांसह १७ व्या स्थानावर आला होता. सौरभ चौधरीने छान कामगिरी करत सहा मालिकांमध्ये ९५, ९८, ९८, १००, ९८ व ९७ गुणांची कमाई केली होती.
२०१८ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकल्यापासून सौरभ चौधरीची कामगिरी उत्तम आहे. त्यामुळे ऑलिम्पिकमधील एकेरी स्पर्धेत मागे पडल्यानंतरही सौरभ चौधरीची मिश्र स्पर्धेमध्ये पदक जिंकण्याची आशा कायम आहे.
१० मीटर एअर पिस्टल मिश्रित स्पर्धा २७ जुलै रोजी होणार आहे. दोन पात्रतेच्या फेऱ्या होणार आहेत. मंगळवारी, दि. २७ जुलै रोजी सकाळी ५.३० वाजता शूटिंग स्पर्धा सुरू होणार आहे. ज्यात पहिली फेरी ही सौरभ चौधरी आणि मनु भाकर यांची असणार आहे.
शनिवारी मेरठच्या सौरभच्या कामिगिरीमुळे निराशा जरी पसरली असली तरी अजून त्याच्या घरच्यांनी धीर सोडला नाही. १९ वर्षीय सौरभच्या मेहनतीवर कुटुंबाचा विश्वास आहे, असे त्याचे वडील जगमोहन सिंग म्हणाले आहेत.
सौरभच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या प्रत्येक कामगिरीने सर्वांना चकित केलं आहे. त्यामुळे पुढील स्पर्धेत सौरभ नक्की पदक जिंकेल. या ऑलिम्पिक स्पर्धेत सौरभ पदक मिळवून येईल, अशी आशा गावकऱ्यांना देखील आहे.