टिओडी मराठी (महेश रेड्डी, ज्ञानेश्वर रेड्डी ) पुणे , दि. 3 ऑगस्ट 2021 – कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून MPSC ‘संयुक्त पूर्व परीक्षा गट – ब’ च्या परीक्षेची तारीख राज्य शासनाकडून वारंवार पुढे ढकलली जात आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी चिंतेत होते. हे सरकार पुन्हा स्वप्नील लोणकर सारख्या घटनांची वाट पाहत आहे का? अशी संतप्त प्रतिक्रिया स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, असोशिएशन, नेते आदींकडून व्यक्त होत होती. त्यामुळे याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, अशी मागणी केली जात होती. आता याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘टिओडी’ला सांगितले आहे कि, मुख्यमंत्र्यांनी फाईलवर सही केली आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी यांची चिंता मिटविली जाईल.
याबाबत ‘टिओडी’ने स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी यांच्यावतीने आवाज उठवला होता. याबाबतचे वृत्त ‘टिओडी’ने टिओडी मराठी. कॉम या संकेतस्थळावर दिले होते. टिओडीच्या दणक्यानंतर प्रशासनाला आली जाग, विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. याची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली असून मुख्यमंत्री यांनी त्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे.
राज्य सरकारने MPSC ‘संयुक्त पूर्व परीक्षा गट – ब’ च्या परीक्षेची तारीख आत्तापर्यंत 6 वेळा ही परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्यातील एकूण 4 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
त्यामुळे ही परीक्षा तातडीने घ्यावी, तसेच ही परीक्षा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन त्यांनी मंत्री यांना दिले आहे. तरीही हे सरकार याबाबत गंभीर दिसून येत नाही, असे आढळत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, याबाबत MPSC ‘संयुक्त पूर्व परीक्षा गट ब’ परीक्षेची तारीख घोषित करण्याची फाईल मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचली आहे. तसेच यावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होणे बाकी आहे.
मुख्यमंत्र्यांची लवकरच फाईलवर स्वाक्षरी झाली आहे, असे समजत आहे. त्यामुळे पुढील दोन – तीन दिवसात परीक्षेची तारीख घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याच संदर्भात टिओडी मराठीने MPSC विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, ते म्हणाले मुख्यमंत्री कार्यालयाचे परीक्षा घेण्यासंदर्भातचे पत्र विभागाला मिळाले आहे. तर कमीतकमी 40 दिवसात MPSC परीक्षा घेण्यात येईल.
परीक्षा घेण्यासाठी MPSC ची देखील पूर्ण तयारी आहे. मात्र, केवळ परवानगीची आवश्यकता आहे, असे यातून स्पष्ट होते. संयुक्त पूर्व परीक्षा गट – ब’ परीक्षेची लवकरच तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.