टिओडी मराठी, मुंबई, दि. 19 मे 2021 – आज (बुधवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय औषधी वनस्पती संस्था महाराष्ट्र राज्यात स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आडाळी येथे 50 एकर जागा दिली जाणार आहे.
यासह, ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना दरमहा 1500 कायम प्रवासभत्ता देण्याचा निर्णय घेतला. यामुळे राज्यातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील चार महत्त्वाचे निर्णय :
– इनाम किंवा वतन जमिनी ज्या भोगवटादार वर्ग-२ च्या आहेत. त्यांची अकृषिक बांधकामे गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करणार आहे. अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
– राष्ट्रीय औषधी वनस्पती संस्था महाराष्ट्रात स्थापन करणार आहे. त्यासाठी आडाळी येथे 50 एकर जागा देणार आहे.
– दिवा रेल्वे स्टेशन येथील लेव्हल क्रॉसिंग वर पुल बांधणे आणि पुलाचे जोड रस्त्याकरीता मंजूर विकास योजनेमध्ये फेरबदल करण्यास मान्यता दिली आहे.
– ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना दरमहा 1500 कायम प्रवासभत्ता दिला जाणार आहे.