“जी मुबारक हो, मुंबई मे हमला होने वाला है, 26/11 की नई ताजी याद दिलायेगा” असा मेसेज मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला आहे. (Threat message to Mumbai Police) त्यामुळे सर्व पोलीस ठाणे आणि यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. पोलीस ट्रॅफिक कंट्रोलला शनिवारी 26/11 प्रमाणे हल्ल्याची धमकी देणारा मेसेज मिळाला असं सूत्रांचे म्हणणं आहे. मुंबई वाहतूक नियंत्रण विभागाच्या व्हाट्सअपवर पाकिस्तानी नंबरवरून धमकीचा संदेश पाठवण्यात आला होता. मात्र त्याचे लोकेशन ट्रेस केल्यास ते भारताबाहेर असल्याने असल्याचे आढळून येईल, असेही मेसेंजरने सांगितले होते.
मुंबईत हल्ला होईल, अशी धमकी संदेश वाहकाने दिली. धमकीच्या संदेशात असंही म्हटलं आहे की, सहा लोक ही योजना भारतात राबवतील. महाराष्ट्रातील रायगड (Suspicious boat in Raigad) जिल्ह्यात शस्त्रास्त्र आणि स्फोटकं घेऊन जाणारी एक बोट जप्त केल्यानंतर दोन दिवसांनीच ही धमकी मिळाली आहे, हे लक्षात घेण्यासारखं आहे.
2008 मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. (Mumbai bomb blast in 2008) 26 नोव्हेंबर 2008 ला झालेल्या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबा या पाकिस्तानी इस्लामी दहशतवादी संघटनेच्या 10 सदस्यांनी 4 दिवसाच्या कालावधीत मुंबईत बारा ठिकाणी गोळीबार आणि बॉम्बस्फोट केले होते.