TOD Marathi

संपूर्ण हयात आयुर्वेदाच्या उत्कर्षासाठी खर्च करणारे ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. सुहास परचुरे (Ayurvedacharya Dr. Suhas Parchure) यांचे मंगळवारी संध्याकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालावली. डॉ. परचुरे (Dr. Parchure) यांनी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (National Integrated Medical Association) (निमा)ची स्थापना केली होती. निमा तसेच आयुर्वेद रासशाळेच्या राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष होते (He was the former president of the National Board of Education of Ayurveda Rassala). ताराचंद धर्मार्थ आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटलचे ते माजी व्यवस्थापकी संचालक होते (He was the former Managing Director of Tarachand Dharmarth Ayurveda College and Hospital). सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आयुर्वेद विभागाच डीन, विद्यापीठाचे अधीसभा सदस्य (Dean of Department of Ayurveda, Savitribai Phule Pune University, Member of the University’s Executive Council) यासह त्यांनी अनेक पदं भूषवली होती.

केंद्रीय आयुर्वेद परिषदेत असताना त्यांनी महाराष्ट्रात आयुर्वेदाच्या नवीन महाविद्यालयांना कोणतीही अपेक्षा न ठेवता परवानगी दिली. त्यामुळे राज्यात आयुर्वेदाचे महाविद्यालयं उभे राहू शकली. ते केवळ आयुर्वेद नव्हे तर सर्वसमावेशक पॅथीचे म्हणजे इंटिग्रेटेड मेडिसिनचे खंदे पुरस्कार होते. आयुष डॉक्टरांच्या अडचणींवर त्यांनी नेहमीच शासनासोबत आयुष बाजूने भांडण केले व त्यांची बाजू देखील स्पष्टपणे मांडली. निमाच्या आज देशभर शाखा आहेत. अखेरच्या श्वासापर्यंत डॉ. परचुरे (Dr. Parchure) लिखाण करत होते. विविध कार्यक्रम या माध्यमातून ते सक्रिय होते. कोरोनाच्या काळात देखील त्यांनी आयुर्वेदिक औषधे ही प्रतिकारशक्तीसाठी उपयुक्त असल्याचेही सांगितले होते. अनेकांनी त्यांना निरपेक्ष भावनेने मदत केली. आयुर्वेदिक क्षेत्रात अनेक नामांकित डॉक्टर देखील त्यांनी घडवले.