TOD Marathi

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ‘काय डोंगार, काय झाडी, काय हाटील’ या डायलॉगमुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेले आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी चांगलंच लक्ष्य केले आहे. शहाजीबापू यांच्यासारखा नौटंकी करणारा माणूस राजकारणात फक्त विनोद करु शकतो. पण एखाद्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करु शकत नाही. ही बाब सांगोला मतदारसंघातील जनतेच्या लक्षात आली आहे. त्यामुळे तिथली लहान मुलं, विद्यार्थीही, ‘शहाजीबापू इज नॉट ओक्के, शिवसेनाच ओक्के’, असे म्हणत असल्याची प्रतिक्रिया विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी दिली. आता या टीकेला शिंदे गटातून काय प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल. (Shahaji Bapu Patil is not OK as a political leader, says Vinayak Raut)

गेल्या काही दिवसांत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सातत्याने शिंदे गटातील आमदारांवर टिका करत आहेत. (Uddhav Thackeray, Aaditya Thackeray criticizing Shinde group) हे सर्वजण गद्दार आहेत, असं सांगत आहेत. शहाजीबापू पाटलांना सांगोल्यात शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना पक्षात प्रवेश देत उद्धव ठाकरे यांनी सांगोल्यातच शहाजीबापू पाटील यांच्यासमोर एकप्रकारे आव्हान उभे केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके (OBC leader Laxman Hake) यांना शहाजीबापू यांच्याविरोधात रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके हेदेखील जोमाने कामाला लागले होते. विधानसभेच्या उमेदवारीबाबत त्यांनी म्हटले की, निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे योग्य निर्णय घेतील. मात्र, एक शिवसैनिक म्हणून सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्येक वस्तीवर आम्ही शिवसैनिक मोठ्या ताकदीने उभा करू. महाराष्ट्रातील सर्वसामान्य कुटुंबामधील तरुणांना आम्ही एकत्रित करत आहोत. माझ्यासमोरील सर्वात मोठं आव्हान हे सांगोला तालुक्यातील प्रत्येक वाडी-वस्तीवर शिवसेनेचे कार्यकर्ते उभे करणे आणि शिवसेनेची शाखा स्थापन करणे आणि त्याच्या नियोजनाची सुरवात हा मेळावा असेल, असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले होते.