TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 16 जुलै 2021 – बकरी ईदसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी सारखेच धोरण असणार आहे, असे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी यांनी पुण्यात बोलताना स्पष्ट केलं.

पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. देशातील सर्व सण कोरोनामुळे साधेपणाने साजरे करणार आहेत, त्यामुळे बकरी ईदसाठी मागील वर्षी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना कायम राहतील, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे, त्यामुळे सरकारने खबरदारी घेण्यास सुरवात केली आहे.

नागरिकांना सण उत्सव साधेपणाने साजरे करावेत, असं आवाहन सरकारच्या वतीने केलं आहे. बकरी ईद सणासाठी राज्य सरकारने मागील वर्षी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. त्याच सूचना यंदाही सुद्धा लागू असतील.