TOD Marathi

मुंबई :
बंड केलेल्या आमदारांची आज नैतिक परीक्षा झाली. ते सर्वजण खाली किंवा इकडे तिकडे बघत होते. ते माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहत नव्हते. मतदार संघात गेल्यावर शिवसैनिकांना ते काय सांगणार आहे. त्यांच्यासमोर कसे जाणार, असा प्रश्नही आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray on rebellion MLAs) यांनी केला.

बंडखोर आमदारांनी बंड पुकारल्यानंतर अगोदर सुरतमध्ये तळ ठोकलं. यानंतर आसाममधील गुवाहाटीमध्ये काही दिवस राहिले. तब्बल ११ दिवसांनी बंड पुकारलेले आमदार रात्री मुंबईत दाखल झाले होते. यानंतर ते रविवारी विशेष अधिवेशनास सहभागी होण्यासाठी विधिमंडळात पोहोचले. (Special session of Maharashtra State Assembly) त्यांनी शिवसेनेचा व्हिप नाकारून भाजपला मतदान केले.

तब्बल ११ दिवसांनी समोर आलेल्या बंडखोर आमदारांकडे आदित्य ठाकरे यांनी बघितले. मात्र, ते आदित्य ठाकरेकडे बघू शकले नाही. ते इकडे तिकडे किंवा खाली मान टाकून बघत होते, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.