पुणे: लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. मुंबई येथे १६ तारखेला त्या राष्ट्रवादी कॉंग्रेस भवनात होणाऱ्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. आपण राजकारणात येण्याचे कारण त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केले आहे.
आतापर्यंत आपण कलेची सेवा केली. आता राजकारणात येऊ आपल्याला कलाकरांसह महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत, असा खुलासा त्यांनी केला आहे. येत्या 16 सप्टेंबरला मुंबईच्या राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये त्यांच्या पक्षप्रवेश होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील.
त्याच सोबत कुठल्याच अपेक्षेने राजकारणात प्रवेश करत नसून लॉकडाऊन काळात व नंतर होत असलेल्या सर्वच क्षेत्रातील कलाकारांच्या व्यथा सरकारदरबारी मांडण्यासाठी मी राजकारणात येत असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. त्यांच्या राजकारणात येण्याने अनेक उलट सुलट चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत, यावर त्यांनी राजकारणात येण्याचे मुख्य कारण समाज मध्यमांवरून शेअर केले आहे.