Covid लस घेतल्यानंतरही लागण झाली तरी रुग्णालयात जाण्याची गरज नाही – व्ही. के. पॉल

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 18 जून 2021 – आरोग्य कर्मचाऱ्यांनाबाबतचा जो अभ्यासाचा अहवाल समोर आलाय. हे लोक संक्रमणाचा सर्वाधिक धोका असलेल्या ठिकाणी असतात. अभ्यासानुसार कोरोना लस घेतल्यानंतर इन्फेक्शन झाले तरी 75 ते 80 टक्के रुग्णालयात जाण्याची आवश्यकता नाही, असे नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी सांगितले आहे.

देशातील लोकांच्या मनात अजूनही कोरोना लसीबाबत काही प्रश्न, भीती कायम आहेत. अशात देशात तीन दिवसांपूर्वीच कोरोना लसीमुळे पहिला मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्याने खळबळ माजली होती.

यानंतर आता कोरोना लसीबाबत मोदी सरकारने मोठी माहिती दिलीय. सरकारने कोरोना लसीमुळे मृत्यू झाल्याचे मान्य केले आहे. त्यानंतर चौथ्या दिवशी केंद्र सरकारने कोरोना लसीबाबत एक अहवाल जारी केलाय.

भारतात सर्वात अगोदर कोरोना लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अभ्यासाचा अहवाल समोर आलाय. कोरोना लसीकरण 16 जानेवारीपासून सुरू झाले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात अगोदर कोरोना लस दिली.

ही लस ज्यांना दिली त्यांचा अभ्यास केला. कोरोना लस हजारोंसाठी संजीवनी ठरली आहे, असे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

ऑक्सिजनची गरज केवळ 8 टक्के भासते. आयसीयूमध्ये जाण्याची वेळ केवळ 6 टक्के असते. कोरोना लसीकरणाचा हा डेटा सांगतो की, कोरोना लस हजारो लोकांचा जीव वाचवतोय. त्यामुळे कोरोना लस घ्या, ही खूप गरजेची आहे, असे आवाहन व्ही. के. पॉल यांनी केलं आहे.

Please follow and like us: