TOD Marathi

जगप्रसिद्ध ‘डार्विन्स आर्च’ समुद्रामध्ये कोसळली; इक्वाडोरच्या पर्यावरण मंत्रालयाची माहिती

टिओडी मराठी, दि. 19 मे 2021 – गॅलापागोस बेटावरील ‘डार्विन्स आर्च’ नावाने जगप्रसिद्ध असणाऱ्या दगडी कमानीचा वरचा भाग समुद्रामध्ये कोसळला. गॅलापागोस बेटाच्या उत्तरेकडील भागात असणाऱ्या ‘डार्विन आर्च’चा वरचा भाग हा ‘नैसर्गिक धूप’ झाल्यामुळे कोसळला, असे इक्वाडोरच्या पर्यावरण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

इक्वाडोरच्या पर्यावरण मंत्रालयाच्या ट्विटरवरून ‘डार्विन आर्च’चा वरचा भाग कोळल्यानंतरचे छायाचित्र अपलोड केले आहे. त्या छायाचित्रात या कमानीचा वरचा भाग कोसळल्यामुळे उरलेले उभे दोन खांब दिसत आहेत. त्याचबरोबर यासंबंधिती माहितीही सोशल मीडियावर दिली जात आहे.

यासंदर्भात माहिती देताना इक्वाडोरच्या मंत्रालयाकडून असे सांगण्यात आलंय की, “कोसळलेली ‘डार्विन्स आर्च’ ही एक जगप्रसिद्ध आणि आकर्षक अशी दगडी कमान होती. ‘डार्विन’ बेटाच्या मुख्य भागापासून १ किलोमीटर अंतरावर ही कमान आढळलेली होती.

‘डार्विन्स आर्च’ ही नैसर्गिकरित्या तयार झालेली दगडी कमान होती. पूर्वी ती ‘डार्विन’ बेटाचा भाग होती. प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ ‘चार्ल्स डार्विन’ यांच्या नावावरून प्रशांत महासागरामध्ये असणाऱ्या या दगडी कमानीला ‘डार्विन्स आर्च’ असे नाव दिले होते”, अशी माहिती दिली आहे.

प्राणी आणि वनस्पतींच्या विविध प्रजातींसाठी ओळखला हा भाग डार्विनच्या उत्क्रातींच्या सिद्धांत्तासाठी प्रसिद्ध आहे. युनेस्कोकडून जागतिक वारसा म्हणून या ठिकाणाला मान्यता दिली आहे. ‘एग्रेसर अव्ह्युंचर्स’ या टूर कंपनीने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून ‘डार्विन्स आर्च’ कोसळल्याची घटना घडली आहे, अशी माहिती शेअर केली होती.

या टूर कंपनीने असं म्हंटलंय की, “दुर्देवाने, आम्ही ‘डार्विन्स आर्च’ कोसळाताना पाहिलं. आमच्या आयुष्यातील एकमेव अशी एक घटना होती. स्थानिक वेळेप्रमाणे ११.२० वाजता आमच्या डोळ्यांसमोर ही घटना घडलीय. जगभरात साहसी सहलीचं नियोजन करणाऱ्या कंपन्या पूर्वीपासून ‘उत्क्रांतीचे स्तंभ’ म्हणून सांगत होते. आम्ही सर्वजण या एकमेव अशा ठिकाणाला आठवत राहू”, अशा आशयाची पोस्ट करत त्यांनी फेसबुकवर ही माहिती दिलीय.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज