TOD Marathi

श्रीलंकेजवळ तेलवाहू जहाज पेटल्याने तेलगळतीचा धोका अधिक; जहाज बुडणार!

टिओडी मराठी, कोलंबो, दि. 27 मे 2021 – मागील आठवड्यात कोलंबोच्या समुद्रकिनाऱ्याजवळ असताना सिंगापूरचे एक मालवाहू जहाजला आग लागली आहे. हे जहाज आता बुडणार आहे, अशी शक्‍यता आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या समुद्र किनाऱ्यावर अधिक प्रमाणावर तेलगळती होणार आहे, असे पर्यावरण संघटनांनी सांगून याबाबत चिंता व्यक्‍त केलीय.

‘एक्‍स-प्रेस पर्ल’ या जहाजाला लागलेली आग विझवण्याचे सर्व प्रयत्न अपयशी झालेत. त्यामुळे आता होणाऱ्या तेलगळतीला सामोरे जाण्याची तयारी प्रशासनाकडून केलीय, असे कोलंबोतील प्रसिद्धी माध्यमांनी म्हटले आहे. हे जहाज अजून अस्थिर असून ते समुद्रात बुडण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

‘एक्‍स-प्रेस पर्ल’ या जहाजावरच्या टाक्‍यांत 325 मेट्रिक टन इंधनाव्यतिरिक्त 1,486 कंटेनरमध्ये सुमारे 25 टन धोकादायक नायट्रिक ऍसिडहि आहे. या जहाजातून कोणतीही तेलगळती झाल्यास पर्यटकांचे एक मोठे आकर्षण असणाऱ्या संवेदनशील नेगोंबो या खाऱ्या पाण्याच्या सरोवराकडे हा तेलाचा तवंग जाणार आहे, असा इशारा सागरी पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने दिलाय. या जहाजातून सांडणाऱ्या तेलाच्या आणि अन्य द्रव पदार्थांच्या संपर्कात न येण्याची सूचना यापूर्वीच स्थानिक नागरिकांना दिली आहे.

हे मालवाहू जहाजमधून गुजरातमधील हजिरा येथून कोलंबो बंदरात सौंदर्य प्रसाधनांसाठीची रसायने आणि कच्च्या मालाची वाहतूक केली जात होती. कोलंबोच्या बंदराच्या बाहेर किनाऱ्यापासून 9.5 सागरी मैलांवर जहाज उभे होते. तेथेच या जहाजाला 20 मे रोजी आग लागली. श्रीलंका नौदल, श्रीलंका पोर्टस ऍथॉरिटी आणि सागरी पर्यावरण संरक्षण प्राधिकरण यांचे विशेष पथक 21 मे रोजी अग्निशमन कंटेनर जहाजनजीक गेले असून आग विझवत आहे.

भारतीय तटरक्षक दलानेही मंगळवारी आयसीजी वैभव आणि वज्र ही दोन जहाजे मदतीला पाठवली होती. खवळलेला समुद्र आणि खराब हवामानामुळे हे मालवाहू जहाज आता उजवीकडे झुकले आहे. परिणामी, जहाजावरील काही कंटेनर समुद्रात कोसळले असून त्यातील काही बुडाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.