टिओडी मराठी, दि. 3 ऑगस्ट 2021 – भारतीय संघाला सहन कराव्या लागलेल्या पराभवाचं खापर नेटकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माथी मारण्यास सुरुवात केली. यातूनच #Panauti (पनवती ) हा ट्रेंड ट्विटरवर सुरू झाला.
ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचायच्या भारतीय संघाच्या आशा मंगळवारी संपुष्टात आल्या होत्या. बेल्जिअमने भारतीय संघावर 5-2 ने मात केली. भारतीय संघाने सामन्याची सुरूवात अत्यंत झंजावात पद्धतीने केली. सुरुवातीला 2-0 असा आघाडीवर असलेला भारत इर्ष्येने खेळत होता, मात्र बेल्जिअमच्या संघाने शेवटच्या सत्रात आक्रमक खेळ करत भारतीय संघावर मात केली.
मंगळवारच्या या सामन्याकडे भारतातील अनेक क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलं होतं. हा सामना भारताने जिंकला असता तर भारताचा संघ अंतिम फेरीत पोहोचला असता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही हा सामना पाहात होते. त्यांनी आपण हा सामना पाहात असताना भारतीय संघाला शुभेच्छा ट्विट करून दिल्या.
यावेळी तेव्हा दोन्ही संघांचे 2 गोल झाले होते आणि सामना बरोबरीमध्ये होता. यानंतर बेल्जिअमने सामना आपल्या बाजूने झुकवत विजय मिळवला.
ट्विटर वापरणाऱ्या एका व्यक्तीने आजच्या दिवसाची तुलना चांद्रयान मोहिमेशी केली आहे. या मोहिमेदरम्यान आपले रॉकेट झेपावल्यानंतर काही मिनिटांत कोसळले होते.
ही मोहीम अपयशी ठरल्यामुळे इस्रो प्रमुख रडले होते. ही मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी बारकाईने पाहात होते, म्हणून असं झालं, असं म्हंटलं जात आहे.
इतर अनेकांनी अशा पद्धतीने आपला संताप व्यक्त केला. काहींनी याचे मीम्स (विनोदी छायाचित्रे) तयार केले असून ते व्हायरल होत आहेत.