टिओडी मराठी, लखनौ, दि. 1 जुलै 2021 – सोमवारी भारताचा चुकीचा नकाशा ट्विटर या लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग कंपनीने दाखवला गेला होता. देशात याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर सायंकाळी उशिरा ट्विटरने हा नकाशा काढून टाकला. जम्मू व काश्मीर आणि लडाख हे या नकाशात भारताचाच भाग न दाखवता स्वतंत्र देश म्हणून दाखविले होते. उत्तर प्रदेश पोलिसांनी याप्रकरणी गु्न्हा दाखल केला आहे. आणि ट्विटर इंडियाचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक मनिष माहेश्वरी यांच्या नावाचाही उल्लेख एफआयआरमध्ये केला आहे.
हा नकाशा ‘ट्वीट लाईफ’ या शीर्षकाखाली ट्विटरच्या वेबसाईटवरील करिअर विभागामध्ये दिसत होता. नेटिझन्सनी याचा निषेध करत ट्विटरवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. ट्विटरने भारताचा चुकीचा नकाशा दाखवण्याची ही पहिली वेळ नाही. त्यांनी याअगोदर लेह हा चीनचा भाग दाखवला होता. ट्विटरला या मुद्यावरुन पाठवलेल्या ई-मेलला त्यांच्याकडून काहीहि प्रतिसाद मिळालेला नाही.
याप्रकरणी सोमवारी सायंकाळी उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष माहेश्वरी यांच्यासह न्यूज पार्टनरशिप हेड अम्रिता त्रिपाठी यांना सहआरोपी केले आहे.
केंद्र सरकारशी अमेरिकेतील ट्विटर या बड्या कंपनीचा संघर्ष सुरूय. वारंवार आठवण देऊनही ट्विटरने देशाच्या माहिती तंत्रज्ञानविषयक नव्या नियमांचे उल्लंघन केलं आहे. ट्विटरने भारताचा चुकीचा नकाशा दाखविण्याची ही कृती या कंपनीला प्रकाशक म्हणून कायदेशीर उत्तरदायी ठरविण्यास पुरेशी आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
More Stories
‘अग्निपथ’साठी लवकरच राबवली जाणार भरती प्रक्रिया
सुशीलकुमार शिंदे राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत? दिल्लीत महत्वाची बैठक
वरुण गांधींचा भाजपला घरचा आहेर; ‘या’ विषयावर केले भाष्य