टिओडी मराठी, नागपूर, दि. 27 ऑगस्ट 2021 – अनेकदा वाहनचालकांना वाहन चालवत असताना हृदयविकाराचा धक्का बसल्याच्या घटना घडल्यात. मात्र, वैमानिकांना हृदयविकाराचा धक्का बसण्याच्या घटना तशा फारच दुर्मिळ. अफागानिस्तानच्या विमानातील वैमानिकासोबत अशीच एक घटना घडली. त्यामुळे या विमानाचं नागपूरमध्ये आपात्कालीन लँडीग केलं.
ओमानची राजधानी मस्कटहून ढाका इथे जाणाऱ्या बांगलादेशी विमनाच्या वैमानिकाला विमान हवेत असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे या विमानाचं तातडीने नागपूर विमानतळावर लँडींग केलं.
या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत विमानातील दुसऱ्या वैमानिकाने कोलकाता एटीसीशी संपर्क साधला असता त्यांना नजीकच्या विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्याची परवानगी दिली होती. या विमानासाठी नागपूर हे विमानतळं सर्वात जवळ होतं. त्यानंतर नागपूरमध्ये हे विमान उतरविलं.
फ्लाईट ट्रँकींग ऍप वरील आकडेवारीनुसार, संबंधित विमान बोईंग 737-8 आहे, अशी माहिती समोर आलीय. या घटनेसंदर्भात अधिक तपशील समोर आला नाही. सध्या ढाका ते कोलकाता दरम्यान आठवड्यातून तीन उड्डाणं सुरू केली आहेत. तर ढाका-दिल्ली या हवाई मार्गावर दोन उड्डाणं चालवली जात आहेत, अशी माहिती बुधवारी बांग्लादेशी विमान प्रशासनाकडून दिली होती.