टिओडी मराठी, दि. 27 जून 2021 – पोलंडमधील फॅशन उद्योगातील आघाडीचे उद्योगपती मारीक पिकाच आपल्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध आहेत. सुमारे 8159 कोटी रुपयांची मालमत्ता असलेला हा उद्योगपती स्वतःच्या कार्यालयात ये-जा करण्यासाठी मोटार न वापरता सायकलचा वापर करत आहे.
एलपीपी एस एल ही पोलंडमधील मोठी फॅशन वस्तू उत्पादक कंपनी असून या कंपनीचे मालक मारेक पिकाच मात्र प्रसिद्धीपासून दूर राहतात. त्यांना स्वतःची छायाचित्रे काढणे देखील पसंत नाही.
आपल्याला कोणी अब्जाधीश म्हणावे, हे देखील त्यांना आवडत नाही. मी माझी संपूर्ण मालमत्ता फाउंडेशनला ट्रान्सफर केली आहे. माझे कुटुंबीय त्या फाऊंडेशनचे लाभार्थी आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
मारेक पिकाच यांच्या या कंपनीचे मुख्य कार्यालय डान्स या शहरांत आहे. या कार्यालयामध्ये कोठेही त्यांच्यासाठी स्वतंत्र केबिन नाही इतर सर्व सहकाऱ्यांसोबत ते सामान्य पद्धतीने टेबलवर बसून काम करतात.
पिकाच यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना कामकाजात संपूर्ण स्वायत्तता दिली आहे. त्यांच्या कल्पनांचे व सूचनांचे मनापासून स्वागत केले जाते.
कंपनीला मिळणाऱ्या नफ्याचा कर्मचाऱ्यांना लाभ मिळतो. पिकाच यांनी 1991 मध्ये आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. तेव्हा पोलंडमधील अर्थव्यवस्था उत्तम प्रकारे विकसित होत होती.
प्रारंभी तुर्कस्तानातून स्वेटर आयात करून यांनी आपला व्यवसाय सुरु केला होता. त्याला आज २५ देशात अठराशे पेक्षा अधिक स्टोअर्सचे मालक म्हणून पिकाच ओळखले जात आहेत.