टिओडी मराठी, मुंबई, दि. 24 जुलै 2021 -हुंडाबंदी अधिनियम अंतर्गत गुन्ह्याप्रकरणी त्वरित कारवाई करावी, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी म्हंटलं आहे.
पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन अंतर्गत दि. 30 जून 2021 रोजी दाखल FIR 0293 बाबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन पत्र देऊन चौकशी करून या प्रकरणी त्वरित कार्यवाहीचे निर्देश दिलेत. या पत्राची एक प्रत पोलीस विशेष महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा (महिला विरोधी अत्याचार प्रतिबंध) यांना दिली आहे.
यातील आरोपींविरुद्ध भादंवि 498, 323, 325, 406, 420, 506, 34 आणि हुंडाबंदी अधिनियमाच्या कलम 3 अंतर्गत FIR क्रमांक 0293/2021 गुन्हा दाखल केला होता.
यात मुख्य आरोपी आणि अन्य सात आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने यात कार्यवाही करणे गरजेचं आहे. या प्रकरणी कनिष्ठ अधिकाऱ्यांना आरोपीला अटक करण्याबाबत आवश्यक मार्गदर्शन करायला हवे.
आरोपींना जामीन मिळणार नाही, याबाबत आवश्यक पुरावे गोळा करायला हवेत. पुराव्यासहित प्रकरण न्यायालयामध्ये मांडले जाणार आहे. या दृष्टीने पाहावे.
तसेच यात पोलीस अभियोक्ता यांनी देखील आरोपींच्या विरोधामध्ये आवश्यक पुरावे सादर करुन खंबीर भूमिका मांडावी. महिला विरोधी अत्याचार विभागामार्फत सुद्धा या प्रकरणांचे पर्यवेक्षण करावे, असे पत्रात नमूद केलंय, असे त्यांनी सांगितले आहे.