अंबाजोगाई: अंबाजोगाई येथील भुमीपुत्र तथा पुणे (नवी सांगवी) येथील प्रख्यात दंत चिकित्सक डॉ. आदित्य पतकराव यांची जगात सर्वात जास्त टॅक्स भरणारे दातांचे डॉक्टर म्हणून लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ही नोंद करण्यात आली आहे.
इंदौर येथे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन यांच्या सदस्यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, बॉलीवुडचे सुप्रसिद्ध गायक उदित नारायण, गीतकार समीर अंजान, अखिलेश मिश्रा (हाय कमिशन रिपब्लिक ऑफ आयर्लंड), शंकर ललवाणी (खासदार इंदौर लोकसभा), अरविंद कापुर (मेजर जनरल, इंडियन आर्मी), संजय शुक्ल (चीफ सेक्रेटरी, म.प्र सरकार), वरून कपूर ( ए. डी. जी म.प्र पोलीस), यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही नोंद करण्यात आली आहे.
डॉ. आदित्य पतकराव यांनी दंत चिकित्सा आणि संशोधनामध्ये केलेल्या कामाबद्दल त्यांचा अनेक संस्थांनी गौरव केला आहे. आता डॉ. आदित्य पतकराव यांच्या दंत चिकित्सा कार्याची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. डॉ. आदित्य यांना या आधी अनेक नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. दंत चिकित्सेमध्ये सर्वाधिक कर देणारे दंत चिकित्सक म्हणून डॉ. आदित्य यांची लंडन येथे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.
या आधी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. त्याच बरोबर पद्मश्री सन्मानित १०८ वर्षीय सालुमरदा थिमक्का, डॉ. करोलिन मकाका आणि हदी हमद अल जरूर यांना पण या सन्मानाने सन्मानित करण्यात आलेले आहे. पिंपरी चिंचवड शहरासाठी दोन नांवाची वर्ल्ड रेकॉर्ड लंडन येथे नोंद झाल्या मुळे व डॉ. आदित्य हे अंबाजोगाईचे असल्यामुळे अंबाजोगाई शहराचे नाव देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक झाले.