टिओडी मराठी, पुणे, दि. 9 मे 2021 – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होईल, असा अंदाज डाॅक्टरांनी वर्तविला आहे. त्यामुळे पुण्यातील येरवडा येथे भारतरत्न राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये लहान मुलांचे कोविड हॉस्पिटल बनविले जात आहे. हे हॉस्पिटल राज्यातील पहिले लहान मुलांचे कोविड हॉस्पिटल ठरणार आहे, असे आमदार सुनील टिंगरे यांनी सांगितले.
सध्या महाराष्ट्र राज्यासह देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण अधिक वाढल्याचे आढळून येत आहेत. याचप्रमाणे कोरोनाची तिसरी लाट आली तर त्याचा सामना सक्षमपणे करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
या भारतरत्न राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये एकूण 200 बेडची सुविधा असणार आहे. त्यात ऑक्सीजन बेड ची संख्या 150 तर आयसीयू बेड की संख्या 50 असणार आहे. माझ्या आमदार फंडातून एक कोटी रुपयांचा फंड दिला आहे. तसेच सोबतच सीएसआर अंतर्गत देखील अधिक प्रमाणात फंड उपलब्ध करून दिलाय.
शुक्रवारी (दि. 7 मे रोजी) अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त रूबल अग्रवाल यांच्या सह हॉस्पिटलची पाहणी केली. यावेळी त्यांनी आवश्यक सुविधांची माहिती घेऊन काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती आमदार सुनील टिंगरे यांनी दिली.