TOD Marathi

टिओडी मराठी, हिसार, दि. 5 ऑगस्ट 2021 – केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय सांख्यिकी सेवा (Indian Statistical Service) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केलाय. यामध्ये हरियाणा राज्यातील हिसारमधील दूध विकणाऱ्या महिलेच्या मुलीने या परीक्षेत यश संपादन केलं आहे. यामुळे देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या मुलीचे नाव कल्पना असून ती हरियाणा राज्यातील हिसार जिल्हातील रहिवासी आहे.

कल्पनाची आई राजमाला ह्या आझाद नगरमध्ये दुधाचा व्यवसाय करतात. मुलीच्या यशामुळे कल्पना यांची आई आनंदी आहे. तसेच तिच्या कुटुंबियांकडून आझादनगर परिसरात मिठाई वाटून आंनद साजरा केला. विशेष म्हणजे कल्पनाने कुठेही विशेष प्रशिक्षण न घेता या परीक्षेत देशात 12 वी रॅंक मिळवली आहे.

तिच्या यशाबद्दल बोलताना कल्पनाची आई म्हणाली, कल्पना लहानपणापासून हुशार आहे. आज तिच्या मेहनतीच फळ तिला मिळालं. तसेच आमच्या कष्टाचं तिने चीज केलंय.

त्यामुळे समाजापुढे तिच्या या यशामुळे एक नवा आदर्श तिने निर्माण केलाय. तिचा हा आदर्श प्रत्येकाने डोळ्यासमाेर ठेऊन अभ्यास करावा. कल्पना हिचे वडील सिवानीमध्ये तैनात आहेत तर, भाऊ रोहतकमध्ये एमबीबीएसमध्ये इंटर्नशिप करत आहे.