सध्या राज्यभर टीईटी घोटाळा गाजत आहे. असं असताना (TET Scam) माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या एका मुलाचं आणि मुलीचं नाव समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. अब्दुल सत्तार यांच्या चार मुलांचं टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. मात्र बदनामीसाठी हा सगळा कट रचल्याचा पलटवार अब्दुल सत्तार यांनी केलाय. आमची चूक असेल तर आमच्या मुलांवर कारवाई करावी. नसेल तर हे सर्व करणाऱ्यांना फासावर लटकवा, असं सत्तार यांनी म्हटलं आहे. या प्रकरणाची नीट चौकशी व्हावी. कुणाचीही बदनामी करण्याचं काम कुणी करु नये. चुकीची माहिती देऊन बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी असंही अब्दुल सत्तारांनी म्हटलं आहे.
याबाबत बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे म्हणाले की, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. यात अब्दुल सत्तारांच्याच नव्हे तर अनेकांची नावं नाहीत तर अनेकांची नावं आहेत. यात विरोधकांचं षढयंत्र असण्याचा प्रश्न नाही. आम्ही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत आहोत, कुणी दोषी असेल तर त्यांना शिक्षा व्हावी. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे, त्यातच हे आढळलं आहे, असंही ते म्हणाले. सत्तारांच्या मुलांचं शिक्षण आहे, त्यांना त्यामुळंच नियुक्ती मिळाली असेल. मी मुलांवर आरोप करणार नाही मात्र या प्रकरणाची चौकशी मात्र व्हायलाच हवी, असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं.
हीना सत्तार, उजमा सत्तार, हुमा फरहीन सत्तार, आमेर सत्तार अशी सत्तार यांच्या मुलांची नावं आहेत. (Ambadas Danve comments over the matter)
टी ई टी घोटाळ्याचा तपास आता ईडीकडे जाण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांनी म्हाडा, आरोग्य आणि टी ई टी परीक्षेच्या संदर्भात झालेला घोटाळा उघडकीस आणला होता. याप्रकरणी काही अधिकाऱ्यांना देखील पुणे पोलिसांनी अटक केली होती. या संपूर्ण प्रकरणाची कागदपत्र तपासासाठी ईडीने पुणे पोलिसांकडून (Pune Police) मागवली आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी ही सर्व कागदपत्र ईडीकडे दिली आहेत.