TOD Marathi

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी गलिच्छ वक्तव्य केलं. (Minister Abdul Sattar statement on NCP leader Supriya Sule) त्यांच्या या वक्तव्यावर विविध ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबई पुण्यासह राज्यभर आंदोलनं आणि निदर्शनही करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी सकाळी जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना अब्दुल सत्तार यांना बडतर्फ करा, अशी मागणी केली. (NCP delegation met Governor and demands resignation of Abdul Sattar) राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांसह सर्वपक्षीय महिला पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

मात्र, या गोष्टीवर ज्यांच्याबद्दल हे वक्तव्य केलं होतं त्यांची प्रतिक्रिया म्हणजे सुप्रिया सुळे (First reaction of Supriya Sule on statement by Abdul Sattar) यांची प्रतिक्रिया आली नव्हती. जवळपास 24 तासांच्या नंतर सुप्रिया सुळे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

“महाराष्ट्राच्या एका मंत्राकडून जे अपशब्द वापरले गेले याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. अशा प्रकारची वक्तव्य हे महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही आणि सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अशी वक्तव्य अपेक्षितही नसतात, असं त्यांनी म्हटले आहे.” सोबतच “याप्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून महाराष्ट्र हा ‘सुसंस्कृत महाराष्ट्र’ आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते अशाही त्या म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया काय?

महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले,याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात.

मला आवर्जून असे सांगायचे आहे की, जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया.

याप्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून महाराष्ट्र हा ‘सुसंस्कृतच महाराष्ट्र’ आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते.
धन्यवाद.
जय हिंद-जय महाराष्ट्र !