TOD Marathi

ज्या झाडाने सावली दिली, ज्याची फळे चाखली त्याच झाडावर घाव घालताना मुख्यमंत्र्यांना काहीच वाटलं नाही का? असा प्रश्न सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अनेक नेतेमंडळींनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. ‘ज्या झाडानी तुम्हाला सावली दिली, ज्याची तुम्ही फळे चाखली, ज्या झाडाने तुम्हाला सगळं काही दिलं त्याच्यावर घाव घालताना जी कुऱ्हाड आहे ते कुऱ्हाड देणारे हात भाजपचे असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

‘मेरी लाठी, मेरी भैस असा प्रकार चालू आहे, आपल्याला अनुकूल असणारे निर्णय घेतले जात आहेत. परंतु खरंच शिवसेना वाचवण्यासाठी निघाला असाल तर अंधेरी पूर्वची मूळ जागा शिवसेनेची असताना भाजपासाठी कशी सोडली? शिंदे गटाने ती जागा का लढवली नाही? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

भाजप शिवसेना संपवायला लागली आहे. असा आरोपही त्यांनी केला. शिवसेना संपवण्याचा प्लान यशस्वी करण्यासाठी भाजप एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) वापर करत आहे. प्लान सक्सेस झाला की एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) देखील भाजपकडून संपवले जाईल, असंही ते म्हणाल्या.

दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबान चिन्ह गोठवले (The Election Commission has frozen Shiv Sena’s Dhanushyaban symbol). त्यानंतर ठाकरे गटाने त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल हे तीन पर्याय दिलेले आहेत (The Thackeray group has given three options namely Trishul, Rising Sun and Mashal). मात्र, हे तिन्ही पर्याय निवडणूक आयोगाकडे शिल्लक असलेल्या चिन्हांच्या यादीत नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे यादीत नसलेले चिन्ह आयोग देऊ शकेल का? किंवा यावर आयोगाच्या वतीने काय तोडगा काढण्यात येईल? हेही लवकर स्पष्ट होईल.