शिवसेनेचं निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray submitted 3 options for party symbol and party name to EC) गटाने निवडणूक आयोगाला तीन चिन्ह आणि तीन नाव देखील दिलेली आहेत. शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत कागदपत्र देण्याची मुदत ठाकरे गटाला देण्यात आली होती. विहित मुदतीत ठाकरे गटानं आपली कागदपत्र निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केली होती. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी उशिरा निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्ष चिन्ह धनुष्यबाण हे गोठवलं होतं. आणि रविवारी दुपारी दोन वाजेपर्यंत तीन नाव आणि तीन चिन्ह हे पर्याय म्हणून मागितले होते.
त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पक्ष चिन्ह आणि पक्ष नावासाठी तीन पर्याय दिलेले आहेत.
१) शिवसेना बाळासाहेब ठाकरे
२) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
३) शिवसेना प्रबोधनकार ठाकरे
असे तीन पर्याय उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या नावासाठी निवडणूक आयोगाकडे दिले आहेत.
१) त्रिशूल
२) उगवता सूर्य
३) मशाल
हे तीन पक्षाचे चिन्ह देखील उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पर्याय म्हणून दिले आहेत.
या तीन नावांपैकी आता कुठलं नाव उद्धव ठाकरेंना पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव म्हणून मिळतं, हे बघावं लागेल. एकनाथ शिंदे (Shinde group didnt submit any option to EC) गटाच्या वतीने मात्र असा कुठलाही पर्याय निवडणूक आयोगाला देण्यात आलेला नाही. अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली. आणि मी जे बोलतोय ते एकनाथ शिंदे साहेबांच्या परवानगीने बोलतोय. आमचा क्लेम हा शिवसेना नावावर धनुष्यबाणावर कायम आहे, असे देखील त्यांनी म्हटलं. त्यामुळे आता उद्धव ठाकरे गटाने तीन पक्ष नाव आणि तीन पक्ष चिन्ह दिले आहेत तर एकनाथ शिंदे गटाने मात्र जुन्याच पक्षावर जुन्याच पक्ष चिन्हावर दावा कायम ठेवला आहे. याबाबत आता निवडणूक आयोग काय भूमिका घेते हे बघावे लागणार आहे.