अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या निमित्ताने अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. शनिवारी रात्री उशिरा निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले. (Shivsena party symbol freezes by EC) मात्र, निवडणूक आयोगाने हे पक्षचिन्ह तात्पुरत्या स्वरूपासाठी गोठवलं आहे. यापूर्वी ही निवडणूक केवळ ठाकरे गट विरुद्ध भाजप अशी होईल असं वाटत होतं. मात्र, या निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाच्या आमदारांनी ही निवडणूक आपण देखील लढवावी अशा प्रकारची मागणी केल्याची माहिती आहे. यासंदर्भात आज रात्री पुन्हा एकदा एक बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीत काय निर्णय होतो, त्यानुसार शिंदे गट पुढची पावलं उचलू शकते. (Shinde group might contest bye election of Andheri east assembly)
शिंदे गटाने त्यांचा उल्लेख भाजपासोबत जाताना युती सरकार असा केला होता. मग युती असताना जेव्हा भाजपने आधीच उमेदवार दिलेला आहे अशा परिस्थितीत पुन्हा शिंदे गट उमेदवार देणार का? उद्धव ठाकरे गटाने दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या पत्नीला तिकीट दिलं असताना त्यांच्याविरुद्ध शिंदे गट उमेदवार देणार का? हेही यानिमित्ताने पाहावं लागणार आहे.
जेव्हा निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवले होते तेव्हा याचा फरक फारसा शिंदे गटाला पडणार नाही असं मत व्यक्त केलं जात होतं कारण तेव्हापर्यंत शिंदे गट ही निवडणूक लढवेल अशा पद्धतीची माहिती नव्हती किंवा त्यांनी उमेदवारही दिला नव्हता. मात्र, आता यापुढे शिंदे गटाच्या काय हालचाली असतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.