राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Monsoon Session) सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान सत्ता पक्षात असलेल्या शिंदे गटातील आमदारांची विरोधी पक्षातील आमदारांशी बाचाबाची झाली. यानंतर आमदारांनी प्रतिक्रिया माध्यमांना दिल्या. यामध्ये शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी ‘अरे हट! ते काय आम्हाला धक्काबुक्की करणार, आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली…’ अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे मागणी करत या आमदारांना कायदा व सुव्यवस्था तसेच लोकतांत्रिक मूल्य याबद्दलची शिकवण द्यावी असे म्हटलंय.
गृहमंत्री अमित शाह जी, शिंदे गुट के विधायक महाराष्ट्र विधानभवन परिसर में सरेआम मविआ विधायकों के बारे में हिंसक वक्तव्य कर के उन्हें धमकाने का काम कर रहे है।@AmitShah @Dev_Fadnavis pic.twitter.com/YCCpkV7to3
— Supriya Sule (@supriya_sule) August 24, 2022
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
गृहमंत्री अमित शाह जी, शिंदे गटाचे महाराष्ट्र विधानसभेतील आमदार विधान भवन परिसरात महाविकास आघाडीच्या आमदारांबद्दल हिंसक वक्तव्य करून त्यांना धमकावत आहेत. आपल्या भाजप पक्षाच्या सोबत युतीत सरकार चालवणाऱ्या लोकांवर कारवाई करा आणि महाविकास आघाडीच्या आमदारांना या आमदारांकडून वाढता धोका पाहता त्यांना झेड प्लस सुरक्षा द्या, अशी माझी विनंती आहे.
महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय वर्तन सत्ताधारी आमदारांनी केलं आहे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आपण महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यांच्याशी लवकरात लवकर चर्चा करून शिंदे गटातील आमदारांना कायदा व लोकतांत्रिक मूल्यांची शिकवण द्या, अशी मागणी देखील खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केले.
सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत ही मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे सोबतच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना देखील या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे यांनी टॅग केलं आहे.