TOD Marathi

नाशिक:

नाशिकमधील इगतपुरी येथील मंतिमंद विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळेत उलट्या होऊन दोन मतिमंद विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (2 students died in Nashik) अन्नातून किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांचा आहे. (Food Poisoning) इतर चार जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना इगतपुरीच्या उपजिल्हा रूग्णालयात हलवण्यात आलं आहे. या घटनेमुळे इगतपुरीसह जिल्ह्याभरात खळबळ उडाली आहे. अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालयात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मंगळवारी रात्री खिचडीचे जेवण केल्यावर आज बुधवारी पहाटेच्या सुमारास ८ विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास सुरु झाल्याची माहिती मिळाली आहे. इगतपुरी शहरात मतिमंद मुलांची शाळा असून या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. सकाळी शाळेतील निवासी मतिमंद मुलांना त्रास होऊ लागल्याने त्यांना इगतपुरी रूग्णालयात (Igatpuri Hospital) दाखल करण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणी दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.