आमच्या काळात मंत्रालयांतून विकासाची कामे केली जात होती. पण आता अशी मंत्रालये राहिलेलीच नाहीत, तर टोमणे मंत्रालय, टिका मंत्रालय, अशी खाती राहिली आहेत, अशा शब्दात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयातील आदेश देशातील सर्व राज्यांसाठी सारखाच होता. मध्यप्रदेश सरकारला ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचवण्यात यश आले. इकडे मात्र महाराष्ट्राचे सरकार अपयशी ठरले.
तसेच सध्याचं राज्य सरकार केवळ याला टोमणे मार, त्याच्यावर टिका कर, महिलांना जेल यात्रा घडवून आणि विरोधकांचा सूड घ्या, येवढीचे कामे हे सरकार करत आहे. आतापर्यंतच्या काळात विकासाची कुठलीही नवीन कामं सरकारनं केली नाहीत, असंही मुनगंटीवार यावेळेस बोलताना म्हणाले.