TOD Marathi

‘इथल्या’ शहरातील शाळेत अजब Policy ; पाचवीपासूनच्या विद्यार्थ्यांना द्यावे लागणार Free Condoms

टिओडी मराठी, वॉशिंग्टन, दि. 10 जुलै 2021 – जगात करोना संसर्गामुळे शाळा बंद आहेत. आता हळूहळू शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे सर्वत्र शाळा कधी सुरू होणार? अशी विचारणा होत आहे. मात्र, अमेरिकेतील शिकागो इथल्या शाळेत अजब पॉलिसीमुळे जगात चर्चेचा विषय ठरत आहेत. तो म्हणजे, नव्या पॉलिसीनुसार पाचवीच्या वरील विद्यार्थ्यांना शाळेकडून कंडोमची व्यवस्था करून द्यावी लागणार आहे. म्हणजे 10 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी कंडोमची व्यवस्था करून देण्याची जबाबदारी शाळेची असणार आहे.

या आदेशानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अमेरिकेतील शिकागो शहरातील शाळांमध्ये जारी केलेल्या या संदर्भातील आदेशानंतर आता सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. लोक या आदेशाला लज्जास्पद व विकृत मानसिकता आहे, असं मानत आहेत.

कंडोमच्या वापरामुळे मुलांमध्ये लैंगिक संक्रमणामुळे होणारे आजार, एचआयव्ही इन्फेक्शन व अनपेक्षित प्रेग्नेन्सी रोखण्यात मदत मिळणार आहे, असे शिकागो पब्लिक स्कूल बोर्ड ऑफ एज्युकेशनच्या वतीने सांगितले आहे.

पाचवीपासूनच्या विद्यार्थ्यांना कंडोम देण्याची पॉलिसी डिसेंबर 2020 मध्ये तयार केली होती. मात्र, कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे याची अंमलबजावणी केली नाही. शिकागोत पुढील महिन्यापासून शाळा सुरू होणार आहेत.