टिओडी मराठी, नांदेड, 1 सप्टेंबर 2021 – राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक केली आहे. एका अनोळखी महिलने ही दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर अज्ञात महिलेने दगडफेक केली. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली असून दगडफेक करणारी महिला कोण होती? याची माहिती मिळालेली नाही. मात्र, ही महिला मनोरुग्ण आहे, असे बोललं जात आहे.
या महिलेने केलेल्या दगडफेकीमध्ये अशोक चव्हाण यांच्या घराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षारक्षकांच्या केबिनची काच फुटलीय. या दगडफेकीमध्ये कुणालाही दुखापत झालेली नाही.
दगडफेकीच्या या घटनेनंतर अशोक चव्हाण यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. ज्यावेळी या महिलेने दगड भिरकावण्यास सुरुवात केली, त्यावेळी सुरक्षारक्षकांनी तिला रोखले. मात्र, एक दगड हा थेट सुरक्षारक्षकांच्या केबिनची काच फुटली.
या महिलेने दगडफेक का केली? या संदर्भात अद्याप मिळालेली नाही. अशोक चव्हाण यांच्या घराच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.